Ajit Pawar : टाचण्यांचे लिंबू, नारळ अन्… दादांच्या घरासमोर तंत्रविद्येचा अघोरी प्रयोग? निवडणुकीच्या तोंडावर खळबळ उडवून देणारी घटना
अजित पवारांच्या निवासस्थानाजवळ अघोरी पूजेचा प्रकार घडल्याने निवडणुकीच्या तोंडावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. बघा व्हिडीओ नेमका काय आहे प्रकार?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवारांच्या बारामती येथील सहयोग निवासस्थान परिसरात एक खळबळजनक प्रकार घडल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या सहयोग निवासस्थान परिसरात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारामतीमधील या घटनेमुळे निवडणुकीच्या तोंडावर तिकीट मिळवण्यासाठी किंवा कापण्यासाठी अशी पूजा केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर अघोरी पूजा किंवा भानामतीचे साहित्य आढळून आले आहे. समोर आलेल्या फोटो आणि व्हिडीओमधून पाहायला मिळतंय. यामध्ये नारळ, लिंबू, कुंकू किंवा अन्य संशयास्पद वस्तू असल्याचे दिसत आहे. बघा व्हिडीओ
Published on: Nov 18, 2025 05:50 PM
