Manikrao Kokate : कोकाटेंवर टांगती तलवार, आज राजीनामा की अजित पवारांकडून अभय मिळणार?

Manikrao Kokate : कोकाटेंवर टांगती तलवार, आज राजीनामा की अजित पवारांकडून अभय मिळणार?

| Updated on: Jul 28, 2025 | 1:13 PM

माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर सोमवारी फैसला होणार असे संकेत अजित पवार यांनी दिले होते. याआधी कोकाटेंना दोन वेळा इशारा दिल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं असल्याने दादांच्या वक्तव्यावरून कोकाटेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं स्पष्ट होतंय

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना अभय मिळणार का? असा सवाल सध्या चर्चेत आहे. आज नेमकं काय होणार? माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार की राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. दरम्यान, यासंदर्भात माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना सवाल केला असता राजीनाम्याबद्दल तुम्हाला का सांगू? असा उलट सवाल केला. तर चौथ्यांदा चूक झाल्यास माफ करणार नाही, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून होत असलेल्या कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर या भेटीला विशेष महत्त्व आलंय.

दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेतच कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. या आधी सुद्धा शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्यांनी सरकारची अडचण वाढवणाऱ्या कोकाटेंनी सरकारलाच भिकारी म्हटलंय. सोमवारी कोकाटेंचा निर्णय घेऊ असे अजित पवारांनीही म्हटलं होतं.

Published on: Jul 28, 2025 01:11 PM