Ajit Pawar : पहिलं दम द्यायचं बंद करा, काय असेल ते एकदाच बाहेर काढा, अजित दादा भडकले
अजित पवार यांनी आज विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले कोणाकडे कोणते पुरावे असतील तर त्यांनी ते
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला नाहीतर आणखी व्हिडीओ बाहेर काढेल, असं म्हणत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट चॅलेंज दिलं होतं. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल केला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना प्रतिआव्हानच दिलं आहे.
‘एकदाच ज्यांच्याकडे जे व्हिडीओ आणि पेन ड्राईव्ह आहेत ते बाहेर काढा, हे दम द्यायचं पहिले बंद करा. कोणाकडे कोणते व्हिडीओ आहेत? कोणाकडे कोणते पेनड्राईव्ह आहेत? कोणाकडे हनीट्रॅपची काय माहिती आहे? हे सगळंच एकदा बाहेर येऊ द्या. यानंतर सगळ्यांनाच सगळं कळेल’, असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांना फटकारलंय. पुढे अजित पवार असेही म्हणाले, एकदा काय ती वस्तूस्थिती समोर येऊद्या. हनी ट्रॅप प्रकरणात पुण्यात प्रफुल्ल लोढा यांच्यासंदर्भात गुन्हाही दाखल झाल्याची माहिती आहे. हनी ट्रॅप प्रकरणात वरिष्ठ अधिकारी, नेते यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सगळेच संशयाच्या भोवऱ्यात आहे. म्हणून खरोखर कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी समोर आणावे, त्याची चौकशी केली जाईल.
