Varsha Gaikwad | खासगी शाळांच्या 15 % फी कपातीचा निर्णय : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

| Updated on: Jul 28, 2021 | 8:37 PM

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के फी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. 

Follow us on

मुंबई: महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के फी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. सुप्रीम कोर्टानं राजस्थान सरकारला दिलेल्या निकषा प्रमाणं महाराष्ट्रातही खासगी शाळांची फी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनी शाळांची फी 85 टक्के भरावी, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. पालकांना मोठ्या प्रमाणात आशा होती, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळेल, असं त्या म्हणाल्या.