Sangali – सांगलीच्या पूरपट्ट्यात महापालिका अग्निशमक दलाकडून प्रात्यक्षिक देण्यास सुरूवात

| Updated on: Jun 18, 2022 | 4:47 PM

पूर परिस्थितीत नागरिकांनी नेमकं काय कराव हे प्रशिक्षण देण्यात आलं , मिरज , कृष्णा घाट या भागातील नागरिकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे व अग्नीशामक दलाचे अधिकारी प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित होते.

Follow us on

सांगली – गतवर्षी सांगलीत पुराने (flood) हाहाकार माजवला होता. मागील पुराचा अनुभव बघता यंदा सांगली महानगरपालिकेने  (Sangli Municipal Corporation) अभिनव उपक्रमा राबवला. सांगलीतील पूर पट्ट्यातील नागारिकांना पुरापासून बचाव करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी पुराच्या पाण्यात आपला बचाव कसा करायचा याची प्रात्यशिके (Demonstration)करून दाखवली. पूर परिस्थितीत नागरिकांनी नेमकं काय कराव हे प्रशिक्षण देण्यात आलं , मिरज , कृष्णा घाट या भागातील नागरिकांना हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे व अग्नीशामक दलाचे अधिकारी प्रशिक्षण देण्यासाठी उपस्थित होते. याबरोबरच घरात गॅस गळती झाली. घरत कोणी अडकलं तर काय करावे याचे प्रशिक्षण ही देण्यात आले.