Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून पंढरपुरात भाविकांसाठीच्या सुविधांचा आढावा
Pandharpur Ashadhi Ekadashi : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरातल्या सोईसुविधांची पाहणी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सोलापूर, पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे यांनी पंढरपूरमध्ये भाविकांसाठीच्या सुविधांचा आढावा घेण्यात आला आहे. स्वच्छतागृह आणि हिरकणी कक्षाची एकनाथ शिंदे यांच्याकडून यावेळी पाहणी करण्यात आली. आमदार समाधान औतडे यांच्या दुचकीवर बसून देखील शिंदेंनी परिसराची पाहणी केली. याठिकाणी आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या तंबू दवाखान्यात जाऊन देखील उपमुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी केली.
रविवारी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात मोठ्या संख्येने वारकरी भाविक गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवासुविधांचा आढावा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन शिंदेंनी हा आढावा घेतला. त्यानंतर ते पुन्हा सोलापूर येथून मुंबईकडे रवाना झाले.
Published on: Jul 03, 2025 06:19 PM
