Special Report | गोव्यामधील CM पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात

Special Report | गोव्यामधील CM पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात

| Edited By: | Updated on: Mar 13, 2022 | 11:25 PM

भाजपला गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काटावरचं बहुमत मिळालं आहे, त्यामुळे गोव्यात भाजपला प्रचंड मोठा अस्थिरतेचा धोका आहे. एकीकडे भाजपला काटावर बहुमत मिळाले आहे तर दुसरीकडे मात्र भाजपमध्येच मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे.

भाजपला गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काटावरचं बहुमत मिळालं आहे, त्यामुळे गोव्यात भाजपला प्रचंड मोठा अस्थिरतेचा धोका आहे. एकीकडे भाजपला काटावर बहुमत मिळाले आहे तर दुसरीकडे मात्र भाजपमध्येच मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु आहे. विश्वजीत राणे हे भाजपमधून निवडून आले असले तरी त्यांच्या काही राजकीय भूमिकेमुळे भाजपमधीलच वरिष्ठ नेते संभ्रमात आहेत. विश्वजीत राणे यांच्याबद्दल नेते संभ्रमात असतानाच निकालानंतर त्यांनी एकट्याने जाऊन राज्यपालांची भेट घेतल्याने राज्यातील भाजपच्या नेत्यांसह राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनाही विश्वजीत राणेंच्या राजकारणाचा तळ सापडणे अवघड झाले आहे. त्यामुळे भविष्यात काटावर असणारं भाजप आता मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात टाकतं ते आता येणारा काळच ठरवणार आहे.