CM Fadnavis : नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री नाराज? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, माझं अन् शिंदे साहेबांचं….

CM Fadnavis : नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री नाराज? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, माझं अन् शिंदे साहेबांचं….

| Updated on: Aug 26, 2025 | 7:08 PM

एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. यावर स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय.

नगरविकास विभागामधल्या अधिकाऱ्यांवर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली होती. मुख्यमंत्री फडणवीसांनी शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहावर नगरविकास खात्याची बैठक घेतली होती. मात्र या बैठकीला एकनाथ शिंदेंनी दांडी मारली. दरम्यान, प्रोटोकॉलनुसार, एकनाथ शिंदे या बैठकीला हजर असणं अपेक्षित होतं तर त्यांनी स्वतःहून नगरविकास खातं मागून घेतलं होतं. तरी फडणवीसांनी बोलवलेल्या बैठकीला शिंदेंनी दांडी मारली असल्याने चर्चाना उधाण आलं होतं.

दरम्यान, यावर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझं आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले आहेत’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत. इतकंच नाहीतर कुणीही आमच्यामध्ये विस्तव टाकला तरी आम्ही सोबतच असणार असेही त्यांनी म्हटलंय. तर महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे नेतोय असं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.

Published on: Aug 26, 2025 07:08 PM