Devendra Fadnavis :  जरांगे पाटलांकडून सातत्याने मुख्यमंत्र्यांना टार्गेट… फडणवीस म्हणाले, मला आनंद….

Devendra Fadnavis : जरांगे पाटलांकडून सातत्याने मुख्यमंत्र्यांना टार्गेट… फडणवीस म्हणाले, मला आनंद….

| Updated on: Aug 31, 2025 | 5:55 PM

मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरील उपोषणादरम्यान सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत असल्याचे दिसतंय. यावर सवाल केला असता यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे

राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशातच मनोज जरांगे पाटील आपल्या आरक्षणाच्या मागणीवर ठाम असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते सातत्याने टार्गेट करत असल्याचे पाहायला मिळतंय. गेल्या दोन दिवसांपासून जरांगे पाटील आपल्या उपोषणादरम्यान सातत्याने फडणवीस यांना टार्गेट करत असल्याचे माध्यमांतून पाहायला मिळत आहे. यासंदर्भात फडणवीसांना सवाल केला असता त्यांनी यावरही प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला आनंद आहे…मला उपहास सहन करणे, शिव्या खाणे याची मला सवय आहे. माझ्यावर याचा काहीही परिणाम होत नाही. कारण लोक तुम्हाला तुमच्या कर्तृत्त्वाने इतिहासात लक्षात ठेवतात. आपले कर्तृत्व काय आहे हे महत्त्वाचे आहे. मला कोणीही कितीही शिव्या दिल्या तरी जे समाजाच्या हिताचे आहे आणि जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने सांगितलेले आहे त्याच्या बाहेर मी जाऊ शकत नाही आणि जाणारही नाही’, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

Published on: Aug 31, 2025 05:55 PM