Devendra Fadnavis on Rahul Gandhi | राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले राहुल गांधी म्हणजे रिजेक्टेड माल…

Devendra Fadnavis on Rahul Gandhi | राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले राहुल गांधी म्हणजे रिजेक्टेड माल…

| Updated on: May 11, 2026 | 2:20 PM

देशातील परिस्थिती अशी झाली आहे की आता नागरिकांना काय खरेदी करावे आणि कशावर खर्च कमी करावा याबाबत सूचना द्याव्या लागत आहेत,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “देशामध्ये सर्वाधिक रिजेक्टेड नेता म्हणजे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड मालाला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना दोष देता येत नाही, कुठेतरी त्यांची समज कमी आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

इराण-इस्त्राईलमधील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक स्तरावर जाणवू लागला असून, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सोन्याची खरेदी टाळण्याचे, परदेश दौरे कमी करण्याचे आणि पेट्रोलचा वापर मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले. तसेच ऊर्जा बचतीसाठी कंपन्यांनी शक्य असेल तिथे ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीचा अवलंब करावा, असेही त्यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “सरकारकडून दिले जाणारे हे सल्ले नसून गेल्या काही वर्षांतील धोरणात्मक अपयशाचे संकेत आहेत. देशातील परिस्थिती अशी झाली आहे की आता नागरिकांना काय खरेदी करावे आणि कशावर खर्च कमी करावा याबाबत सूचना द्याव्या लागत आहेत,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “देशामध्ये सर्वाधिक रिजेक्टेड नेता म्हणजे राहुल गांधी आहेत. रिजेक्टेड मालाला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना दोष देता येत नाही, कुठेतरी त्यांची समज कमी आहे,” अशा शब्दांत फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

 

Published on: May 11, 2026 02:20 PM
Follow Us