Devendra Fadnavis : या वयातही शरद पवार…. फडणवीसांकडून तोंडभरून कौतुक, भरभरून बोलले

Devendra Fadnavis : या वयातही शरद पवार…. फडणवीसांकडून तोंडभरून कौतुक, भरभरून बोलले

| Updated on: May 29, 2025 | 2:54 PM

एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याबद्दल बोलत असताना त्यांच्या कार्यपद्धतीचं भरभरून कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शरद पवार गट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक करण्यात आले आहे. शरद पवार हे जय विजय किंवा पराजयाचा विचार न करता सातत्याने काम करत राहतात, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शरद पवारांचे कौतुक करण्यात आले आहे. पुढे देवेंद्र फडणवीस असेही म्हणाले की, या वयातही शरद पवार काम करतायत. देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या राजकीय वर्तुळातील देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातल्या परिश्रम आणि सातत्य याचं भरभरून कौतुक केलं आहे.

तर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या शरद पवारांच्या कौतुकानंतर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ज्याअर्थी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच इतकं कौतुक केलं, त्याअर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल.’ असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. तर आम्हाला पवारांविषयी आदर व्यक्त करण्याला कोणाची परवानगी लागत नाही. भाजपचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात, असंही खोचक वक्तव्य संजय राऊतांनी फडणीसांच्या या वक्तव्यानंतर केलं आहे.

Published on: May 29, 2025 02:54 PM