गोव्याचा मुख्यमंत्री कोण असणार? प्रमोद सावंतांना संधी मिळणार? देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गोवा राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत नवी दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत.
महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. गोवा राज्यातील मुख्यमंत्री पदाबाबत नवी दिल्लीत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रमोद सावंत गोव्यातून दिल्लीत रात्री दाखल होणार आहेत. सावंत यांच्या येण्यापूर्वी फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विश्वजीत राणे यांचं मुख्यमंत्री पदाबाबत बंड शमणार का ? याबाबत आजच्या बैठकीत काय निर्णय होणार यावर अवलंबून असेल. अमित शहा यांच्या उपस्थितीत राजधानी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.
