मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता…  त्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं थेट उत्तर

मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, मग आता… त्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांचं थेट उत्तर

| Updated on: May 31, 2026 | 12:23 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री आमरण उपोषण मागे घेतले. उपोषणवेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. भर उन्हात त्यांच्या या आंदोलनाने राज्यात वातावरण तापले होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मध्यस्थी यशस्वी ठरली.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री आमरण उपोषण मागे घेतले. उपोषणवेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. भर उन्हात त्यांच्या या आंदोलनाने राज्यात वातावरण तापले होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मध्यस्थी यशस्वी ठरली. सरकारने काही मागण्यांवर वेळ मागून घेतला, तो जरांगे यांनी मान्य केला. त्यानंतर या सर्व घडामोडींवर देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं; त्यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनांवरही भाष्य केले.

फडणवीस म्हणाले, “विखे पाटील यांनी घेतलेल्या भेटीत अनेक मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्या सर्व मागण्या स्वतः त्यांनीच वाचून दाखवल्या. यानंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला असावा. महत्त्वाची बाब म्हणजेच आमची भूमिका नेहमीची मराठा समाजाला न्याय देण्याची राहिली आहे.”

यानंतर फडणवीसांनी रोहित पवारांच्या एका विधानावरही वक्तव्य केलं; त्यांनी रोहित पवारांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये असा सल्लाही दिला. रोहित पवारांनी पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर यांच्या उत्सवातील खर्चाच्या सविस्तर हिशोबाविषयी विधान केलं होतं.

Published on: May 31, 2026 12:11 PM
Follow Us