Devendra Fadnavis : झुठ बोले कौवा काटे; आधी पक्षातील नेत्यांशी तरी बोलायचं होतं! फडणवीसांची राहुल गांधींना चपराक

Devendra Fadnavis : झुठ बोले कौवा काटे; आधी पक्षातील नेत्यांशी तरी बोलायचं होतं! फडणवीसांची राहुल गांधींना चपराक

| Updated on: Jun 24, 2025 | 3:40 PM

CM Devendra Fadnavis Tweet : राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करत उत्तर दिलं आहे.

‘झुठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो’, असं उत्तर राहुर गांधींच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. परभवामुळे होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याचा टोला देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी लगावला आहे. किती दिवस हवेत बाण मारणार असंही फडणवीस यांनी म्हंटलं. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलेलं आहे.

राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मतदारांच्या वाढलेल्या संख्येवरून आरोप केलेले होते. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे. आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे की, ‘झुठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो.. मान्य आहे की महाराष्ट्रात दारुण झालेल्या पराभवाची तुमची वेदना दिवसागणिक वाढत आहे. पण आपण असं किती काळ हवेत बाण सोडत राहणार आहात? तुमच्याच पक्षातील विकास ठाकरे, नितीन राऊत, अस्लम शेख यांच्याशी हे ट्विट करण्यापूर्वी बोलायचं होतं. किमान कॉंग्रेसमध्ये संवादाचा अभाव इतक्या उघडपणे दिसून आला नसता, असा खोचक टोला फडणवीसांनी राहुल गांधींना लगावला आहे.

Published on: Jun 24, 2025 03:40 PM