देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे खरे खलनायक, संजय राऊत यांचा आरोप
महायुतीच्या कारभारा विरोधात महाविकास आघाडीने आज रविवार हुतात्मा चौकात मोठा मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. या संदर्भात सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
महाराष्ट्र तोडण्यासाठी आणि विदर्भ वेगळा करण्यासाठी ज्यांनी लग्न न करण्याचा निर्धार केला होता ते देवेंद्र फडणवीस आम्हाला शिकवित आहेत. त्यांनी कधीही महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार केलेला नाही त्यांनी सतत महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घातले ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे खरे व्हीलन आहेत. त्यांचे मंत्री केसरकर महाराजांचा पुतळा पडला तर या मागे काही चांगले घडणार असे संकेत असतील असे बेताल बोलतात आणि त्यांना फडणवीस पाठीशी घालतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील शिव छत्रपतींविषयी खुलेआम अपशब्द काढले त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस गप्प राहीले, त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेचे काही पडलेले नाही असा टोलाही शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
Published on: Sep 01, 2024 01:09 PM
