Ghrishneshwar Temple : पहिल्या श्रावणी सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात बाचाबाची अन् राडा, नेमकं घडलं काय?

Ghrishneshwar Temple : पहिल्या श्रावणी सोमवारी घृष्णेश्वर मंदिरात बाचाबाची अन् राडा, नेमकं घडलं काय?

| Updated on: Jul 28, 2025 | 11:39 AM

श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी भाविकांनी महादेवाचं दर्शन घेण्यास मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी असणाऱ्या शिवमंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या असून दर्शनाचा लाभ घेतला आहे. मात्र वेरूळ येथील प्रसिद्ध घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांकडून सेवेकऱ्याला मारहाण केल्याचे समोर आलंय.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील प्रसिद्ध घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांनी एका सेवेकऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मंदिरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या सेवेकऱ्याला मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. तर मंदिराच्या बंद द्वारातून प्रवेश देण्यासाठी भाविकांकडून आग्रह केला जात होता मात्र त्या द्वारातून प्रवेशास बंदी होती. प्रवेशास नकार दिल्यामुळे भाविकांकडून सेवेकऱ्याला चांगलीच मारहाण करण्यात आली.

श्रावण सोमवारच्या दिवशी मंदिरात भाविकांची खूप गर्दी झाली होती. याच गर्दीत काही भाविकांनी एका सेवेकऱ्याला मारहाण केली. मंदिराच्या व्यवस्थापनाने या घटनेची नोंद घेतली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. सध्या मंदिर परिसरात परिस्थिती नियंत्रणात आहे. तर ही घटना घडल्याने भाविकांमध्ये आणि मंदिर प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Published on: Jul 28, 2025 11:39 AM