Dhananjay Munde Video : राजीनाम्याचा दबाव वाढला, मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर धनंजय मुंडे स्पष्टच म्हणाले, ‘…ही माझी इच्छा’
आज धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा फैसला होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र कॅबिनेटच्या बैठकीला मुंडे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत, त्यांना धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावे दिले. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही अजित पवार यांच्याकडे केली. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा फैसला होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र कॅबिनेटच्या बैठकीला मुंडे उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुंडेंनी राजीनाम्याविषयी आपली बाजू मांडली. राजीनाम्यासंदर्भात सवाल केला असता मुंडे म्हणाले राजीनाम्यासंदर्भात मी काही बोलणार नाही, असं स्पष्टपणे सांगत त्यांनी सविस्तर बोलणं टाळल्याचे पाहायला मिळाले. अंजली दमानिया यांनी अजित पवारांची आज भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी काही कागदपत्र दिलेत. मात्र यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उत्तर देतील. अंजली दमानिया यांनी जे काही पुरावे दिले. त्याविषयी अधिक न बोलता त्यांनी आपल्या राजीनाम्याविषयीचा निर्णय हा सर्वस्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतली, असे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.
