Dharmaveer Puja | ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये, आनंद दिगेंची प्रतिकृती उभारुन पूजा – Thane

Dharmaveer Puja | ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये, आनंद दिगेंची प्रतिकृती उभारुन पूजा – Thane

| Updated on: May 13, 2022 | 11:09 AM

या प्रतिकृतीची विधिवत पूजा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पूजा पार पडली. सकाळी होणाऱ्या पहिल्यावाहिल्या शो आधी ही पूजा आयोजित करण्यात आलेली.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत धर्मवीर सिनेमाच्या पहिल्या शो आधी ठाण्यात जंगी कार्यक्रम पार पडला. दिग्गजांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. पहिल्या शो आधी विधीवत पूजा विवियाना मॉलच्या सिनेमागृहाबाहेर करण्यात आली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक, निर्माते मंगेश देसाई आणि संपूर्ण टीमही हजर होती.आनंद दिघे यांची प्रतिकृती विवियाना मॉलमध्ये साकारण्यात आली होती. या प्रतिकृतीची विधिवत पूजा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पूजा पार पडली. सकाळी होणाऱ्या पहिल्यावाहिल्या शो आधी ही पूजा आयोजित करण्यात आलेली.

Published on: May 13, 2022 11:09 AM