Disha Salian मृत्यू प्रकरणातील Exclusive बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर…

Disha Salian मृत्यू प्रकरणातील Exclusive बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर…

| Updated on: Mar 29, 2025 | 1:41 PM

मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियानच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बघा काय आहे एक्सक्लूसिव्ह बातमी?

दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील एक एक्सक्लूसिव्ह बातमी समोर आली आहे. दिशा सालियन ज्यावेळी १४ व्या मजल्यावरून पडली तेव्हा ती इमारतीच्या संरक्षण भिंतीच्या बाहेर पडली. दिशा १४ व्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर समोरच उभ्या असलेल्या गाडीतील तरूणांनी तिला पाहिलं. दरम्यान, कारमधील दोन तरूणांसह वॉचमन आणि तिसऱ्या मजल्यावरील कुटुंबाने सुद्धा तिला जखमी अवस्थेत पाहिल्याची मोठी माहिती समोर येत आहेत. यावेळी कारमधील दोन तरूणांनी पोलिसांना दिशासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, ‘दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर कपडे होते.’, कारमधील दोन तरूणांसह वॉचमन आणि तिसऱ्या मजल्यावरील कुटुंबाने हा जबाब पोलिसांना दिला. क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी १०० ते १५० जबाब नोंदवले होते. दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरण तपासाच्या जवळपास ८ महिन्यांनंतर या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला होता. हा रिपोर्ट मंजूर झालेला होता. मात्र एसआयटी स्थापन झाल्याने सध्या नव्याने या प्रकऱणाचा तपास सुरू असून जो अद्याप प्रलंबित आहे.

Published on: Mar 29, 2025 01:26 PM