Disha Salian : सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, ‘ती’ महिला कोण?

Disha Salian : सतीश सालियान यांचा पोलिसांना दिलेला जबाब समोर, ‘ती’ महिला कोण?

| Updated on: Apr 03, 2025 | 12:26 PM

Disha Salian Case Updates : दिशा सालियान हिच्या मृत्यूनंतर सतीश सालियान यांनी पोलिसांना दिलेला जबाब आता समोर आलेला आहे. त्यातून मोठा खुलासा झाला आहे.

दिशाच्या सालियानच्या मृत्यूनंतरचा सतीश सालियान यांचा जबाब टीव्ही9 च्या हाती आला आहे. सतीश सालियान यांच्या संपर्कात असलेल्या महिलेबद्दल दिशाला गैरसमज झाले होते. वडील सतीश सलियान हे संपर्कात असलेल्या महिलेला पैसे देत होते, दिवंगत मित्राच्या पत्नीची अडचण असल्याने सतीश सालियान हे पैसे देत होते. यावरूनच दिशा आणि सतीश सालियान यांच्यात सतत वाद होत होते, असा जबाब आता समोर आलेला आहे.

दिशाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी ज्यावेळी तिच्या मित्रमैत्रिणींचा जबाब नोंदवला होता तेव्हा दिशाने तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधाबद्दल मित्रांना सांगितलेलं होतं अशी माहिती मित्रांनी पोलिसांना दिली होती. मात्र जेव्हा मुंबई पोलीस, एसआयटीने दिशाचे वडील सतीश सलियन यांचा जबाब नोंदवला तेव्हा त्यांनी हे मान्य केलं होतं की, या संबंधित महिलेला मी पैसे पाठवत होतो. मात्र आमच्याबद्दल दिशाला गैरसमज झालेला होता. सतीश सालियान आणि त्यांच्या मित्राने भागीदारीमध्ये लोणच बनवण्याचा व्यवसाय सुरू केलेला होता. मधल्या काळात या मित्राचं निधन झालं. त्यानंतर या मित्राच्या पत्नीची आर्थिक अडचण होती. त्यावेळी मदत म्हणून त्या महिलेला आपण पैसे देत असल्याचं सतीश सालियान यांनी जबाबात म्हंटलं आहे.

Published on: Apr 03, 2025 12:26 PM