Mahadev Munde Case : बदला म्हणून न्याय नको…माझ्या मुलांच्या मनातून… ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?

Mahadev Munde Case : बदला म्हणून न्याय नको…माझ्या मुलांच्या मनातून… ज्ञानेश्वरी मुंडे नक्की काय म्हणाल्या?

| Updated on: Jul 17, 2025 | 2:15 PM

'पोलिसांकडे चकरा मारणं मला आता असहाय्य झालं आहे. मीच राहिले नाही तर तुम्हाला न्याय कोण मागणार? म्हणून मी काल टोकाचं पाऊल उचललं आणि विष घेतलं. मी एसआयटी, सीआयडीची मागणी केली तेव्हा पण काहीच नाही. तेव्हाच आम्हाला कळून आलं की पोलिसांना आरोपी माहिती आहेत'.

गेल्या 18 महिन्यांपूर्वी महादेव मुंडे यांची परळी शहरात निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र अद्याप त्यांचे मारेकरी मोकाट असल्याने मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे काल आक्रमक होत त्यांनी बीड एसीपी ऑफिस समोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करताना काल विष प्राशन केलं. सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माध्यमांशी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या, ‘एसपींची सुरुवातीपासून सकारात्मक भूमिका आहे. एसपंवर विश्वास आहे. मला माझ्या मुलांसाठी न्याय पाहिजे, माझ्या लेकरांच्या मनातून मला काढायचंय की माझ्या पप्पाच्या मारेकऱ्याला मारायचंय. माझ्या लेकरांना मला चांगल्या वळणावरती घालायचंय असं बदलाच्या भावनेसाठी न्याय नकोय’, असं महादेव मुंडेंच्या पत्नी म्हणाल्या. पुढे त्या असंही म्हणाल्या, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रियाताईंनी फोन केला आपण न्याय घेऊ असं म्हणाले. मी एक महिना थांबणार आहे. अजून मी एसपी ऑफिस समोर येऊन आत्मदहन करणार असल्याचे म्हणत पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलं आहे.

Published on: Jul 17, 2025 02:15 PM