Devendra Fadnavis : जेपी नड्डा यांच्या वक्तव्यावर संभ्रम निर्माण करू नका, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 01, 2022 | 8:38 PM

जेपी नड्डांनी असं म्हंटल की, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात जी काही शिवसेना होती, ती शिवसेना राहिलेली नाही. आता ही नवीन शिवसेना याठिकाणी झालेली आहे. ही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आहे. ठाकरेंची शिवसेना राहिलेली नाही, असं त्यांनी म्हंटल.

Follow us on

मुंबई : जेपी नड्डा यांच्या वक्तव्याबद्दल संभ्रम निर्माण करू नका, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हंटलं. जेपी नड्डांनी असं म्हंटल की, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात जी काही शिवसेना होती, ती शिवसेना राहिलेली नाही. आता ही नवीन शिवसेना याठिकाणी झालेली आहे. ही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आहे. ठाकरेंची शिवसेना राहिलेली नाही, असं त्यांनी म्हंटल. त्यामुळं कृपा करून संभ्रम निर्माण करू नका, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, ते एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत. ज्या शिवसेनेनं त्यांना फसविलं ती शिवसेना राहिलेली नाही. राज्यात भाजप-सेनेची युती राहणार, असं त्यांना म्हणायचं असेल.