Special Report | ब्रिटनच्या इतिहासातील सगळ्यात महागडा घटस्फोट

Special Report | ब्रिटनच्या इतिहासातील सगळ्यात महागडा घटस्फोट

| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 10:44 PM

ब्रिटनमधील एका कोर्टाने दुबईच्या शेखला त्याची पहिली बायको आणि मुलांना 554 मिलीयन पाउंडची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम भारतीय रुपयानुसार 5540 कोटी रुपये होते. ब्रिटमधील सर्वात महागड्या घटस्फोटापैकी हा एक घटस्फोट आहे.

ब्रिटनमधील एका कोर्टाने दुबईच्या शेखला त्याची पहिली बायको आणि मुलांना 554 मिलीयन पाउंडची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम भारतीय रुपयानुसार 5540 कोटी रुपये होते. ब्रिटमधील सर्वात महागड्या घटस्फोटापैकी हा एक घटस्फोट आहे. लंडनमधील कोर्टाने शेख मोहम्मद अल मकतूम यांना राजकुमारी हया बिंत अल-हुसेन यांच्या सुरक्षेसाठी आणि इतर बाबींसाठी तीन महिन्यांच्या आत 251.5 मिलीयन पाउंड देण्याचे आदेश दिले आहेत.

कोर्टाने पुढे म्हटले आहे की, जोपर्यंत मुलांचे शिक्षण पूर्ण होत नाही, तोपर्यंत शेख यांना 11 मिलीयन पाउंड वर्षाला मुलांच्या शिक्षणासाठी द्यावे लागतील. सुरक्षा म्हणून 290 मिलीयन पाऊंड बँकेत जमा करावे लागणार आहेत. कोर्टाने ही घटस्फोटानंतर राजकुमारी हया यांना आर्थिक मदत होईल असे म्हटले आहे. दुबईच्या शासकाने आपली पत्नी आणि तिच्या कायदेविषयक टीमचे फोन हॅक करण्यास शेख यांनी सांगितले होते. शेख यांनी त्यांच्या बाजूने कोणताही दावा केला नाही.

Published on: Dec 22, 2021 10:35 PM