आम्हाला तोंड उघडायला लावू नका, महाराष्ट्राचा अनुभव.. सुप्रीम कोर्ट ED वर संतापलं, कर्नाटकातील ‘ते’ प्रकरण काय?
कर्नाटकमधल्या एका प्रकरणावरून सुप्रीम कोर्टानं ईडीला चांगलच सुनावले. तुमचा राजकीय वापर का होऊ देत आहे? असा सवाल सुप्रीम कोर्टानं ईडीला विचारला आहे. ईडीचे महाराष्ट्राबाबतचे अनुभव संपूर्ण देशामध्ये पसरू नका, असं सुप्रीम कोर्टानं ईडीला म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्टानं ईडीला चांगलंच फटकारलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नीविरोधात ईडीने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. सिद्धरामय्या यांच्या पत्नी पार्वती यांच्या विरोधामध्ये एमयूडीए कथित घोटाळा प्रकरणामध्ये कारवाई करण्यापासून कर्नाटक हायकोर्टानं ईडीला रोखलं होतं. या विरोधात ईडीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
यावेळी सुप्रीम कोर्ट ईडीच्या अधिकाऱ्यांवर संतापलं. आम्हाला तोंड उघडायला लावू नका, नाहीतर आम्हाला ईडीविरोधात कठोर राजकीय शब्दांचा वापर करावा लागेल. दुर्दैवानं आम्हाला महाराष्ट्राबाबत काही अनुभव आहेत, ते देशामध्ये पसरू नका. राजकीय लढाई मतदारासमोर लढायला हवी. त्यात तुमचा वापर का होऊ देत आहे? अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं ईडीला फटकारला आहे. मैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे जमीन वाटप केल्याप्रकरणी ईडीने सिद्धरामय्या यांच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावलं होतं. या विरोधामध्ये सिद्धरामय्या यांच्या पत्नी हायकोर्टात गेल्या होत्या. बघा प्रकरण नेमकं काय?
