Varsha Gaikwad LIVE | अकरावीची परीक्ष कोर्टाकडून रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात…

Varsha Gaikwad LIVE | अकरावीची परीक्ष कोर्टाकडून रद्द, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात…

| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 4:37 PM

अकरावीच्या प्रवेशासाठीची साईटी परीक्षेसंदर्भात आज हायकोर्टाने निर्णय दिला आहे. अकरावी अॅडमिशन प्रोसेससाठी पुढे काय करता येईल यासाठी आम्ही अभ्यास करतो आहे. उच्च न्यायालयानं काय म्हटलं आहे ते पाहून पुढील निर्णय घेऊ, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी टीव्ही 9 मराठी सोबत बोलताना सांगितलं आहे.

राज्यात 11 प्रवेशसाठी होणारी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने हा महत्वाचा निकाल दिला. दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 11 वी मध्ये प्रवेशासाठी 21 ऑगस्ट रोजी CET परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.राज्य सरकारनं अकरावी सीईटी परीक्षेसाठी काढलेला अध्यादेश मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे. मुंबई हायकोर्टाचा निकाल वाचून पुढील निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.