Eknath Khadse : …म्हणून 15 मिनिटांआधी तरूणींना आणलं अन्… पुण्याच्या पार्टीवरून खडसेंचा खळबळजनक आरोप

Eknath Khadse : …म्हणून 15 मिनिटांआधी तरूणींना आणलं अन्… पुण्याच्या पार्टीवरून खडसेंचा खळबळजनक आरोप

| Updated on: Jul 31, 2025 | 8:18 AM

पुण्यातल्या पार्टीच्या प्रकरणावरून खडसे यांनी पुणे पोलिसांवर प्लँट रचल्याचा आरोप केलाय. जावई खेडवलकरांना अडकवण्यासाठी 15 मिनिट आधी दोन अनोळखी तरुणी आल्या आणि त्यांच्याकडेच गांजा सदृश्य पदार्थ सापडला. त्यामुळे या कारवाईवरून खडसे यांनी आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही जाण्याची तयारी केलीये.

जावई प्रांजल खेडवलकरांना अडकवण्यासाठी पोलिसांनीच दोन तरुणींना प्लाँट केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. पुणे पोलिसांनी पार्टी सुरू असलेल्या एका रूममध्ये जेव्हा छापा टाकला तेव्हा सात जणांना अटक केली. त्यापैकी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी यांच्याशी खेडवलकरांची 15 दिवस आधीच ओळख झाली. यादव आणि पोपटाणी यांनीच व्हिडिओत दिसणाऱ्या दोन तरुणी ईशा सिंह आणि प्राची शर्माला आणलं. हे चौघे आल्यानंतर 15 मिनिटांनीच पोलिसांनी छापा टाकला, हा योगायोग कसा? असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला.

छाप्याचा जो व्हिडिओ समोर आलाय त्यात पोलिसांची धाड पडताच एक तरुणी पर्समधून तात्काळ गांजा सदृश्य पदार्थ काढून देते. ज्यांच्याकडे गांजा किंवा अमली पदार्थ सापडतो त्यांना पोलीस न्यायालयात कोठडी मागते आणि ज्यांच्याकडे काहीही सापडलं नाही त्यांची पोलीस कोठडी कशी मागता? यावरून देखील खडसे यांनी शंका व्यक्त केलीये. दुसरीकडे रोहिणी खडसे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतलीय. ज्यामध्ये खेडवलकरांची बदनामी करणारे व्हिडिओ कसे समोर आले याची चौकशी करण्याची मागणी केलीये. कोर्टात सुनावणीच्या वेळी देखील रोहिणी खडसे वकिलीचा कोर्ट घालून हजर राहिल्या. यावेळी जावई खेडवलकरांनी देवाशपथ घेऊन ड्रगशी आणि त्या तरुणींशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितलंय अशी माहिती खडसे यांनी दिलीय.

Published on: Jul 31, 2025 08:18 AM