Eknath Shinde Corona Positive | शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची बाधा

Eknath Shinde Corona Positive | शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची बाधा

| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 1:27 PM

राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही आता कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही आता कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. नुकतीच त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरु आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातील जवळपास 20 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त राजकीय नेते कोरोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली होती. त्यात आज आणखी एका मंत्र्याची भर पडली आहे.