एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा-सांगली मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कडून अभयसिंह जगताप हे उमेदवार मैदानात आहेत. या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यापूर्वी शिवसेनेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची भूमिका जाणून घेतली होती. या बैठकीतील भावना आणि मतांचा अहवाल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला होता.
या अहवालानंतर एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट निर्देश देत सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाचे मत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच मिळाले पाहिजे, असे सांगितले आहे. तसेच शिवसेनेचे एकही मत फुटता कामा नये, अशा सूचना त्यांनी शंभूराज देसाई यांना दिल्याचे समजते.
दरम्यान, सातारा-सांगली मतदारसंघात महायुतीकडे विजयासाठी आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे. भाजप हा या मतदारसंघातील सर्वात मोठा पक्ष असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आपल्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचीही चर्चा आहे.
या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीचा वापर होणार असल्याने सर्वच पक्षांनी खबरदारी घेतली असून, कोणतीही मतफूट होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.