Video | स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून 10 लाखांची मदत : एकनाथ शिंदे

Video | स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून 10 लाखांची मदत : एकनाथ शिंदे

| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 8:02 PM

त्यांनी लोणकर कुटुंबीयांना शिवसेनेतर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 

पुणे : एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नुयक्ती मिळत नसल्यामुळे स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता नगरविकासमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वप्ननीलच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी लोणकर कुटुंबीयांना शिवसेनेतर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.