Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन; फोन टॅपिंगच्या आरोपावरून एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर गंभीर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींवर फोन टॅपिंगचे बिनबुडाचे आरोप करण्याच्या मुद्यावरून शिंदे यांनी राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन असल्याची खोचक टिप्पणी केली. देशाच्या प्रगतीला राहुल गांधींच्या पोटातील दुखणं जबाबदार असल्याचेही शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधींना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं असल्याचं शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपांवरून एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केले. हेडलाईन्समध्ये राहण्यासाठी राहुल गांधी पंतप्रधान मोदींवर बिनबुडाचे आरोप करत असल्याचा दावा शिंदे यांनी केला.
शिंदे यांनी प्रश्न विचारला, “पंतप्रधान मोदींना एवढंच काम पडलंय का, की ते राहुल गांधींचा फोन टॅप करतील?” पंतप्रधान मोदी देशाला पुढे नेत आहेत, देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे आणि आर्थिक महासत्तेकडे जात आहे, असे शिंदे यांनी नमूद केले. देशाची ही प्रगती राहुल गांधींना आवडत नसल्यामुळे त्यांना पोटदुखी होत आहे, असेही ते म्हणाले. वारंवार खोटं बोलणं, खोट्या गोष्टी रेटून सांगणं ही राहुल गांधींना लागलेली सवय नसून, ते आता व्यसन बनले आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
