काही लोकं तर फक्त … एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता…

काही लोकं तर फक्त … एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता…

| Updated on: Jun 08, 2026 | 4:09 PM

दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. आज 20 राज्यांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. विविध राज्यांमध्ये शिवसेना वाढवण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना इतर राज्यांमध्ये मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

इंडिया आघाडीवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आजच्या बैठकीत अनेक प्रमुख पक्ष अनुपस्थित होते. आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस बैठकीत नव्हत्या. काही नेते फेसबुकवर आले आणि चेहरा न दाखवता निघून गेले, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

राहुल गांधींवर टीका करताना त्यांनी देशात 1 वर्ष काम करून दाखवावे, असे आव्हान दिले. तसेच मोदी सरकार आल्यानंतर मोठ्या घोटाळ्यांचे आरोप झाले नाहीत, असेही ते म्हणाले.

रायगड पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, तर नाशिक विधानपरिषद निवडणुकीचाही तोडगा लवकर निघेल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Published on: Jun 08, 2026 4:02 PM
Follow Us