स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच… एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात यंदा ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला विशेष महत्त्व मिळणार आहे. लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात प्रथमच ‘वंदे मातरम्’ हे गीत गायले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, “हा क्षण ऐतिहासिक आहे आणि सगळी जनता याच 140 कोटी जनता याच स्वागत करते’ किसका किसीने इसका विरोधनही करना चाहिये सभी कहना चाहिये” त्यांच्या या वक्तव्यामुळे ‘वंदे मातरम्’च्या कार्यक्रमाबाबत राज्यातील चर्चेला आणखी वेग आला आहे.
यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ‘वंदे मातरम्’ गीताच्या 150 वर्षांच्या प्रवासाचा विशेष उल्लेख केला जाणार आहे. तसेच 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या उद्दिष्टात तरुण भारतीयांचे योगदान अधोरेखित केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठी तयारी सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर देशाला संबोधित करतील. त्यानंतर संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीत सादर केले जाणार आहे. देशभरातील नागरिकांचे लक्ष या ऐतिहासिक सोहळ्याकडे लागले असून, कार्यक्रमात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. यामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन सोहळा विशेष ठरण्याची शक्यता आहे. या सोहळ्यामुळे देशातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.