EVM Scandal: 1 कोटी द्या… EVM मॅनेज करतो; व्हायरल Audio क्लिपनं खळबळ, संवाद नेमका काय?

| Updated on: Dec 01, 2025 | 10:53 AM

नाशिकच्या चांदवडमध्ये ईव्हीएम मॅनेजमेंटबाबत एक धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. एका व्यक्तीने 1 कोटी रुपये दिल्यास ईव्हीएमवर 11,000 मते मिळवून देण्याचा दावा केला आहे. या क्लिपमुळे चांदवडचे राजकारण तापले असून, नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये ईव्हीएम मॅनेजमेंटसंदर्भात एक खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये एक कोटी रुपये दिल्यास ईव्हीएम मशीनमधील मते वाढवून देण्याचा दावा करण्यात आला आहे. या क्लिपमुळे चांदवडमधील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नगराध्यक्षपदासाठीचे अपक्ष उमेदवार राकेश अहिरे आणि भाजप पदाधिकाऱ्याचा भाऊ शक्ती ढोमसे यांच्यात संभाषण झाल्याचे म्हटले जात आहे.

शक्ती ढोमसे नावाच्या व्यक्तीने भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला निवडणुकीच्या निकालाआधीच 13,642 मते मिळाल्याचा दावा केला. याबाबत विचारणा केली असता, ईव्हीएम मशीनवाल्याशी बोलणं झालं आहे, असे त्याने सांगितल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येते. याशिवाय, राकेश अहिरे यांना देखील 1 कोटी रुपये दिल्यास 11,000 पेक्षा जास्त मते मिळवून देण्याची ऑफर दिल्याचे क्लिपमध्ये स्पष्ट होत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर अपक्ष उमेदवार राकेश अहिरे यांनी या क्लिपसंदर्भात तक्रार दाखल केली असून, त्या आधारे गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. यामुळे चांदवडच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Published on: Dec 01, 2025 10:53 AM