Amravati : भर पावसात अडीचशे फूटावरील चिमणीवर दोघे चढले, 24 तासापासून शोले स्टाईल आंदोलन, मागणी काय?

Amravati : भर पावसात अडीचशे फूटावरील चिमणीवर दोघे चढले, 24 तासापासून शोले स्टाईल आंदोलन, मागणी काय?

| Updated on: May 28, 2025 | 10:17 AM

अमरावतीच्या अचलपूरमध्ये काही कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन सुरू आहे. थकीत वेतन मिळण्यासाठी फिनले मिल कर्मचाऱ्यांचे गेल्या २४ तासांपासून अडीचशे फूट वर असणाऱ्या चिमणीवर चढून आंदोलन सुरू आहे.

अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी मागील 24 तासापासून भर पावसात अडीचशे फूट वर चिमणीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू आहे. भर पावसात ही विकेश उघडे आणि मनोज सूर्यवंशी या कामगारांचे हे आंदोलन आहे. तर कामगारांचे आंदोलन कव्हर करण्यापासून फिनले मिल प्रशासनाने माध्यमांना रोखले असल्याची माहिती मिळतेय. माध्यमांना फिनमिलमध्ये आत जाण्यास परवानगी नाकारली आहे. तर अनेक कामगार चिमणीच्या खाली बसून आंदोलन करत आहे. फिनले मिल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे वेतन थकीत आहे. हे थकीत वेतन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अनोखे आंदोलन करण्यात येत आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी याच चिमणीवर चढून आंदोलन केले होते. तर फीनले मिलमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्याही केल्या आहेत. दरम्यान जोपर्यंत वेतन देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

Published on: May 28, 2025 10:17 AM