MNS : मीरा-भाईंदरच्या मोर्चा प्रकरणी मनसेला मोठा धक्का बसणार? ठाकरेंच्या सेनेचाही होता सहभाग, मोठी अपडेट काय?

MNS : मीरा-भाईंदरच्या मोर्चा प्रकरणी मनसेला मोठा धक्का बसणार? ठाकरेंच्या सेनेचाही होता सहभाग, मोठी अपडेट काय?

| Updated on: Jul 09, 2025 | 12:59 PM

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये नुकताच एक मोर्चा काढण्यात आला होता. मनसे, ठाकरे यांची शिवसेना मराठी एकीकरण समितीकडून हा मोर्चा काढला होता. मात्र आता आयोजकांवर कारवाईची शक्यता आहे.

मीरा-भाईंदरच्या मोर्चा प्रकरणी आता कारवाई होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा ज्या दिवशी निघाला तेव्हा जमावबंदीचे आदेश देण्यात आले होता. तर जमावबंदीचे आदेश असतानाही आंदोलन केल्याने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आयोजकांवर कारवाईची शक्यता वर्तविली जात असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, काल ८ जुलै मंगळवारी मीरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचादेखील सहभाग पाहायला मिळाला होता. मात्र मनसेच्या या मराठी मोर्चाची परवानगी पोलिसांनी नाकारली होती तरी देखील हा मोर्चा काढण्यावर मनसे ठाम होतं.

MNS : मध्यरात्रीपासून ते दुपारी 4 पर्यंत मनसेच्या मोर्चात काय घडलं? मीरारोडचं वातावरण कसं तापलं?

Published on: Jul 09, 2025 12:59 PM