Churchgate Fire : चर्चगेट स्टेशनवर आग्नितांडव, धुराचे लोट अन् प्रवाशांमध्ये भिती, नेमकं घडलं काय?

Churchgate Fire : चर्चगेट स्टेशनवर आग्नितांडव, धुराचे लोट अन् प्रवाशांमध्ये भिती, नेमकं घडलं काय?

| Updated on: Jun 05, 2025 | 7:10 PM

चर्चगेट रेल्वे स्थानकात लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. ज्यामुळे स्थानकातील सबवे बंद करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तसेच आजूबाजूचा परिसर तातडीने रिकामी करण्यात आला होता.

मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशन हे नेहमीच प्रवाशांनी गजबजलेलं असतं. याच रेल्वे स्टेशनवर गुरुवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास एका केकच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. अवघ्या काही क्षणात सर्वच रेल्वे स्टेशनवर धुराचे लोट पाहायला मिळाले. या घटनेनंतर चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळालं. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. आगीची घटना घडल्याची माहिती मिळताच पोलिसांची मोठी फौज आणि अग्निशमन दलाची टीम दाखल झाली. त्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्न सुरू असताना स्टेशन परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, घडलेल्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या चर्चगेट रेल्वे स्थानकातील सर्व परिस्थिती नियंत्रणात आली असल्याची अधिकृत माहिती समोर येत आहे.

Published on: Jun 05, 2025 07:10 PM