याला वेड म्हणावं की… एकाच फ्लॅटमध्ये एक-दोन नाहीतर तब्बल 350 मांजरी, ‘कॅट लव्हर’ मालकाचा रहिवाशांना मनस्ताप

याला वेड म्हणावं की… एकाच फ्लॅटमध्ये एक-दोन नाहीतर तब्बल 350 मांजरी, ‘कॅट लव्हर’ मालकाचा रहिवाशांना मनस्ताप

| Updated on: Feb 17, 2025 | 3:43 PM

पुण्यातील हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील काही रहिवाशींनी 2020 मध्ये पुणे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्या संबंधित महिलेकडे 50 मांजरी असल्याचे समोर आले होते.

पुण्यातील हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत एका महिलेने एक दोन नव्हे तर तब्बल 350 मांजरी घरात पाळल्या आहेत. 3 BHK फ्लॅटच्या मालकाच्या या मांजर प्रेमामुळे रहिवाशांचा मनस्ताप वाढला आहे. 3 BHK फ्लॅटमध्ये इतक्या मोठ्या संख्येने मांजरी ठेवल्यामुळे दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्येला रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे. मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील काही रहिवाशींनी 2020 मध्ये पुणे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी त्या संबंधित महिलेकडे 50 मांजरी असल्याचे समोर आले होते. गेल्या पाच वर्षात हा आकडा 350 पर्यंत पोहोचल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, या मांजरांचा उग्र वास तसेच ड्रेनेजमधून जाणारे दूषित पाणी आणि मांजराच्या ओरडण्याचा प्रचंड आवाजाने रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याची तक्रार आहे. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली आहे. मात्र महानगरपालिकेकडून पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Feb 17, 2025 03:43 PM