Vijay Wadettiwar : पुरामध्ये 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान : विजय वडेट्टीवार

| Updated on: Aug 03, 2021 | 4:13 PM

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Follow us on

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. यावेळी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी नुकसानीचं सादरीकरणही करण्यात आलं. त्यानंतर पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी 11 हजार 500 कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.