कोकणच्या सुपुत्राचा Sword of Honour ने सन्मान, कोकणवासियांची मान उंचावली 

| Updated on: Jun 22, 2021 | 10:22 AM

प्रज्वलने हे स्वप्न सत्यात तर उतरवलंच, पण त्यासोबतच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिला जाणारा 'Sword of Honour' हा बहुमानही त्याला मिळाला.

Follow us on

सिंधुदुर्गातील प्रज्वल कुलकर्णी या मुलाने शालेय दशेत एक फार मोठे स्वप्न पाहिलं आणि तब्बल 11 वर्षांच्या खडतर तपश्चर्येनंतर त्याने ते सत्यातही उतरवलं. जगातील चौथ्या क्रमांकाची बलाढ्य वायुसेना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय वायुसेनेत फायटर पायलट बनण्याचं प्रज्वल कुलकर्णीचे स्वप्न होतं. प्रज्वलने हे स्वप्न सत्यात तर उतरवलंच, पण त्यासोबतच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीसाठी दिला जाणारा ‘Sword of Honour’ हा बहुमानही त्याला मिळाला. देशपातळीवरचा हा किताब मिळणारा प्रज्वल हा कोकणचा पहिला सुपुत्र ठरला आहे. (Flying Officer Prajwal Kulkarni from Sindhudurg awarded CAS Sword of Honour)