Pune | उन्हाचा कडाका वाढल्यानं प्राणिसंग्रहालयातील विविध प्राण्यांच्या विभागात फॉगर

| Updated on: Mar 29, 2022 | 7:20 PM

उन्हाळ्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली सध्या वाढली आहे. ऊन प्रचंड प्रमाणात वाढल्याने प्राणीसंग्रहालयातील विविध प्राण्यांच्या विभागात फॉगर लावण्यात आले आहेत. प्राणीसंग्रहालयातील विविध प्राण्यांची विशेष काळजी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घेतली जाते. दरवर्षी येथील प्राण्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात येत असतात. त्यात प्राण्यांना उन्हाच्या झळा लागू नयेत, म्हणून व्यवस्था केली जात असते.

Follow us on

YouTube video player

पुणे : पुण्यातील राजीव गांधी कात्रज प्राणीसंग्रहालय (Rajiv Gandhi Zoological Park & Wildlife Research, Katraj) याठिकाणी वाघांचे (Tiger) उन्हापासून रक्षण व्हावे, यासाठी फॉगर (Fogger) लावण्यात आले आहेत. प्राण्यांची उन्हाळ्यात विशेष काळजी घेतली जात आहे. उन्हाळ्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली सध्या वाढली आहे. ऊन प्रचंड प्रमाणात वाढल्याने प्राणीसंग्रहालयातील विविध प्राण्यांच्या विभागात फॉगर लावण्यात आले आहेत. प्राणीसंग्रहालयातील विविध प्राण्यांची विशेष काळजी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घेतली जाते. दरवर्षी येथील प्राण्यांसाठी सुविधा निर्माण करण्यात येत असतात. त्यात प्राण्यांना उन्हाच्या झळा लागू नयेत, म्हणून व्यवस्था केली जात असते. आता फॉगर लावण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात उन्हाचा चटका प्राण्यांना लागणार नाही. ते त्यांच्या खंदकात मोकळेपणाने वावरू शकतील.