विक्री प्रतिनिधी ते लॉजिस्टिक्स लीडर: गौरव शर्मा यांची टाटा ACE सोबतची वाटचाल
गौरव शर्मा, ट्रक्स कार्गो प्रा. लि. चे सीईओ आणि संस्थापक, यांनी आपली दूरदृष्टी प्रत्यक्षात आणत टाटा ACE च्या मदतीने एक यशस्वी लॉजिस्टिक्स व्यवसाय उभा केला.
तीच वाटचाल यशस्वी ठरते, जिच्यात वेग आणि दिशा दोन्ही योग्य असतात. हे वचन म्हणजे गौरव शर्मा यांच्या प्रवासाचे सार. एकेकाळी दिल्लीमध्ये विक्री प्रतिनिधी म्हणून काम करणारे गौरव, वेगवेगळ्या व्यावसायिकांशी संपर्कात आल्यावर उद्योजकतेची बीजे त्यांच्या मनात रोवली गेली.
2018 साली त्यांनी ट्रक्स कार्गो प्रा. लि. ची स्थापना केली आणि पारंपरिक लॉजिस्टिक्स पद्धतीत तंत्रज्ञानावर आधारित बदल घडवून आणला. सुरुवातीला त्यांनी ई-कॉमर्स डिलिव्हरीवर लक्ष केंद्रित केले, पण 2021 मध्ये त्यांनी आपल्या व्यवसायात टाटा ACE ट्रक्स समाविष्ट करून व्यवसायात आणखी विस्तार केला.
फक्त दोन टाटा ACE सह सुरू झालेली ही वाटचाल आज 280 वाहनांपर्यंत पोहोचली आहे, यातील 250 टाटा ACE ही त्यांच्या व्यवसायाचा कणा आहेत. अॅमेझॉन, डेलिव्हरी, एकार्ट आणि ब्ल्यू डार्ट यांसारख्या नामांकित कंपन्यांचा विश्वास मिळवलेल्या गौरव यांनी अभिमानाने सांगितले – “अब मेरी बारी!”