Fuel Price in maharashtra: पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त; शिंदे-भाजप सरकारची घोषणा

| Updated on: Jul 14, 2022 | 2:54 PM

मुख्यामंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना यामध्ये मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात आणि ज्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यांना अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाची रक्कम 50 हजार इतकी असेल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा […]

Follow us on

मुख्यामंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना यामध्ये मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात आणि ज्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यांना अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाची रक्कम 50 हजार इतकी असेल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे मत यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले. याशिवाय सर्वात मोठी बाब म्हणजे इंधनावरील कर कमी करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. पेट्रोल 5 रुपयांनी आणि डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाने सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. याशिवाय 18 ते 59 वयोगटातील जनतेला बूस्टर डोज मोफत देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.