“गुलाबी गप्पा”.. , ये रिश्ता क्या कहलाता है; महाजनांनी खडसेंचा लोढासोबतचा फोटो टाकला
मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचा प्रफुल लोढासोबतचा फोटो ट्विट करत टीका केली आहे.
हनी ट्रॅपसह इतर गंभीर गुन्ह्यांप्रकरणी नाव असलेल्या प्रफुल लोढामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यात सध्या जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. लोढाशी असलेल्या संबंधांचा वापर करत जुन्या व्हिडीओ आणि छायाचित्रांचा आधार घेऊन दोघेही एकमेकांना राजकीय कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
गिरीश महाजन यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, एकनाथ खडसे. तुमच्या या “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय. हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे. 2019 ते 2022 च्या दरम्यान अश्या खोट्या पुराव्यांचा आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली, अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच. आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे, त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय? एकनाथ खडसे. काय तुझी ही व्यथा, असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधलाय.
