Girish Mahajan | जनआक्रोश मोर्चात गोंधळ; वाहतूक कोंडीवर संतप्त महिलेचा गिरीश महाजनांना जाब, व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?

Girish Mahajan | जनआक्रोश मोर्चात गोंधळ; वाहतूक कोंडीवर संतप्त महिलेचा गिरीश महाजनांना जाब, व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?

| Updated on: Apr 22, 2026 | 1:22 PM

महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपकडून राज्यभरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील जांबोरी मैदान परिसरात झालेल्या या मोर्चामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून, काही ठिकाणी संतापही व्यक्त करण्यात आला. या दरम्यान एका संतप्त महिलेने थेट मंत्री गिरीष महाजन यांना जाब विचारत रोष व्यक्त केला. या

महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपकडून राज्यभरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील जांबोरी मैदान परिसरात झालेल्या या मोर्चामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून, काही ठिकाणी संतापही व्यक्त करण्यात आला. या दरम्यान एका संतप्त महिलेने थेट मंत्री गिरीष महाजन यांना जाब विचारत रोष व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
या घटनेवर आज मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. मोर्चे वगैरे असल्यावर अशा गोष्टी घडतात असे ते म्हणाले. यापुढे काळजी घेऊ, असे महाजन म्हणाले. काल हजारो महिला मुंबई सह देशभरात रस्त्यावर उतरल्या होत्या. काँग्रेसने महिला आरक्षण विरोधात मतदान केले व बिल पास होऊ दिले नाही. काल ट्राफिक कोंडी झाली होती. सर्वच पक्ष मोर्चे काढतात. कालच्या मोर्चात एक भगिनी आल्या, त्या वाट्टेल त्या बोलल्या. पोलिसांना तक्रार करायची होती. मी बाईट देताना त्या आल्या. पोलिसांनी त्यांना समजावले. त्या नको त्या भाषेत बोलल्या. महिला पोलीस आल्या. आम्ही संयमाची भाषा वापरली. त्यांनी बाटली देखील फेकून मारली. आम्ही पोलिसांना सांगितले, चिडू नका त्यांना हवे ते बोलू द्या. महिलांच्या आरक्षणासाठीच तो मोर्चा होता. यापुढे काळजी घेऊ. मोर्चा व आंदोलनावेळी काळजी घेतली जाईल असे महाजन म्हणाले.

 

Published on: Apr 22, 2026 01:22 PM
Follow Us