गोंदियात बिबट्याची दहशत की AI मुळे अफवा?

गोंदियात बिबट्याची दहशत की AI मुळे अफवा?

| Updated on: Jan 14, 2026 | 12:21 PM

गोंदिया हा जंगलाला लागून असलेला वनपरिक्षेत्राचा भाग असल्यामुळे या परिसरात बिबट्या, वाघासारखे प्राणी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या बिबट्याच्या फोटोवर दिलीप कौशिक यांनी भाष्य केलयं. सोशल मीडियावर बिबट्याचे मोठ्या प्रमाणात फोटो वायरल होत आहेत.

गोंदिया हा जंगलाला लागून असलेला वनपरिक्षेत्राचा भाग असल्यामुळे या परिसरात बिबट्या, वाघासारखे प्राणी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या बिबट्याच्या फोटोवर दिलीप कौशिक यांनी भाष्य केलयं. सोशल मीडियावर बिबट्याचे मोठ्या प्रमाणात फोटो वायरल होत आहेत. परंतु हे फोटो AI जनरेट करून टाकलेले फोटो असतात. बिबट्याच्या जागी AI जनरेट करून चित्त्याचा फोटो टाकला जातो. असे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. एखाद्या ठिकाणी वन्यप्राणी राहू शकतो. पण खऱ्या गोष्टीकडे लक्ष न देता सोशल मीडियावर सर्रासपणे फोटो व्हायरल केले जात आहे. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती दिलीप कौशिक यांनी दिली. मात्र बिबट्या आढळल्यास वन्य परिक्षेत्राकडून त्याचा बंदोबस्त जरूर करण्यात येईल असा विश्वास दिलीप कौशिक यांनी व्यक्त केलाय.

Published on: Jan 14, 2026 12:21 PM