Gopichand Padalkar | पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत, पडळकरांचा हल्ला
पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत - गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar | पवारांनी ‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत, पडळकरांचा हल्ला

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 12:22 PM

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘कोरोनामुक्त गाव’ (Corona free village) स्पर्धेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी हल्लाबोल केला आहे. ‘सगळं गावच करील तर सरकार काय करील? ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मोडला असताना, त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी त्यांच्या दु:खाची थट्टा करणारी स्पर्धा कशी सुचतेय असा सवाल पडळकरांनी केला आहे. यावेळी पडळकरांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना थेट टार्गेट केलं.