Ahmedabad Plane Crash : आईच्या ऑपरेशनसाठी भारतात आले, परतीच्या प्रवासात गोरेगावचं संपूर्ण कुटुंबच संपलं

Ahmedabad Plane Crash : आईच्या ऑपरेशनसाठी भारतात आले, परतीच्या प्रवासात गोरेगावचं संपूर्ण कुटुंबच संपलं

| Updated on: Jun 13, 2025 | 2:24 PM

Ahemdabad Plane Crash Updates : अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत मुंबईच्या गोरेगावमधील कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

गुजरातच्या अहमदाबादमधील मेघानी येथे काल झालेल्या एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या प्रवासी विमानाचा अपघात झाला आहे. अहमदाबाद एअरपोर्टवरून टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणातंच हे विमानत मेघानी परिसरातील नागरी वस्तीतील इमारतीवर कोसळले. यात तब्बल 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातीलही काही प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतल्या गोरेगावच्या एका कुटुंबावर या अपघाताने काळाचा घाला बसला आहे. गोरेगावचे जावेद अली, त्यांची पत्नी आणि दोन लहानग्या मुलांनी विमान अपघातात जीव गमावला आहे. जावेद अली हे गेल्या 12 वर्षापासून लंडनमध्ये वास्तव्यास होते. जावेद अली यांच्या आईची तब्येत बरी नसल्याने, तिची भेट घेण्यासाठी ते कुटुंबासह 7 दिवसांच्या सुट्टीवर मुंबईत आले होते. आणि काल पुन्हा लंडनला जात होते. मात्र त्याच वेळी विमान अपघात झाला आणि काळाने त्यांच्यावर घाला घातला.

Published on: Jun 13, 2025 02:24 PM