Trilingual formula GR : त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा GR जारी, नेमकं काय म्हटलंय?

Trilingual formula GR : त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा GR जारी, नेमकं काय म्हटलंय?

| Updated on: Jul 02, 2025 | 10:59 AM

16 एप्रिल आणि 17 जून रोजीचे वादग्रस्त त्रिभाषा धोरणावर जारी केलेले दोन्ही जीआर औपचारिकपणे रद्द करण्यात आलेत. नव्या जीआर मध्ये काय-काय म्हटलंय बघा?

त्रिभाषा सूत्रा संदर्भात राज्य सरकारकडून नवीन जीआर जारी करण्यात आला आहे. धोरणाच्या पुनर्विचारासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तर पूर्वीचे दोन जीआर औपचारिकपणे रद्द करण्यात आले आहे, असा नव्या जीआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. तर समिती रघुनाथ माशेलकरांच्या समितीने सादर केलेल्या अहवालचा अभ्यास करणार आहे. नवी समिती तीन महिन्यात आपल्या शिफारसी सादर करेल.

प्राथमिक विभागांमधील त्रिभाषा धोरणाचा पुनर्विचार करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती स्थापन करण्याचे काम सुरु आहे. एनईपी २०२० मधील त्रिभाषिक सूत्राबाबत डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने सादर केलेल्या अहवालचा अभ्यास करणार आहे. यासह ही समिती राज्याला शिफारसी करण्यापूर्वी ते सर्व संबंधित लोकांशी, संघटना आणि व्यक्तींशी चर्चा करणार आहे.

Published on: Jul 02, 2025 10:56 AM