Army helicopter crash :लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर उपचार सुरु

| Updated on: Dec 08, 2021 | 9:36 PM

तामिळनाडूमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. यापैकी माजी लष्करप्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Follow us on

YouTube video player

तामिळनाडू : तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी भारतीय हवाई दलाचे Mi-17V5 हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. मात्र, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे गंभीर जखमी जखमी झाले असून त्यांच्यावर वेलिंग्टन येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत वरुण सिंह हे 80 टक्के भाजले असल्याचे सांगण्यात येत आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वरुण सिंह यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. 2020 मध्ये हवाई आपत्कालीन परिस्थितीत एलसीए तेजस लढाऊ विमान वाचवल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. तामिळनाडूमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. यापैकी माजी लष्करप्रमुख बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.