Gudipadva 2022: फडके रोडवर गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन
यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे वेगळाच उत्साह दिसून येत आहे. डोबिवलीच्या फडके रोडवर गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
आज राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट होते. कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्ष गुढीपाडवा साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने, सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे वेगळाच उत्साह दिसून येत आहे. डोबिवलीच्या फडके रोडवर गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून, या शोभायात्रेत राजकीय नेत्यांनी देखील सहभाग घेतल्याचा पहायला मिळाला.
